- Breaking News, आयोजन, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : 13 पासून खासदार सांस्कृतिक महोत्सव – केंद्रीय नितीन गडकरी व अभिनेत्री काजोल यांची उपस्थिती

नागपूर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वाला शुक्रवारी १३ डिसेंबरला प्रारंभ होत आहे. हनुमान नगरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते आज सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होईल.

अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री व या महोत्सवाचे नितीन गडकरी राहतील. चंद्रशेखर बावनकुळे, मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, आशीष देशमुख, चरणसिंह ठाकूर आदी आमदार उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर लगेच संस्कार भारती प्रस्तुत ‘मैं हूं भारत’ हा भारतीय इतिहासाची गाथा विशद करणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून नागरिकांनी अर्धा तास आधी स्थळी येऊन स्थान ग्रहण करावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, प्रा. राजेश बागडी, बाळ कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, वांदिले, भोलानाथ सहारे, अ‍ॅड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांनी केले आहे.

‘क्यूआर कोड’

यावेळी पार्किंग व्यवस्था व प्रसाधनगृह व्यवस्थेसाठीदेखील क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. पासेसच्या मागे असलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर पार्किंग व प्रसाधनगृहाचा रूट मॅट प्रदर्शित होईल विनाप्रयास दर्शकांना या सुविधांचा वापर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *