नागपूर समाचार : पीत – चंदेरी वस्त्रात आलेल्या कुशल अभिनयसंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्री काजोलने मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच रसिक सुखावले. काजोल यांची उपस्थिती आणि लाघवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत, अतूट प्रेम आणि सन्मानासाठी त्यांनी नागपूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
काजोल यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करताना या महोत्सवामुळे हजारो कलावांताना मंच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. काजोल यांनी हर्षन कावरे या कलाकाराने काढलेली त्यांच्या रांगोळी प्रतिमेचे कौतुक केले आणि फोटो काढून घेतला.