नागपूर समाचार : ‘श्रीगुरू चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि’ या हनुमान चालिसामधील श्लोकांनी शनिवारी सकाळी ईश्वर देशमुख महाविद्यालयाचा परिसर निनादला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवांंतर्गत ‘जागर भक्तीचा’ पर्वाला सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने आबालवृद्धांनी हजेरी लावून भक्तिमय वातावरणात पठणात सहभागी झाले. यावेळी मुख्य म्हणून विश्व हिंदू परिषदेचे अ.भा. संघटक मिलिंद परांडे, महानगर मंत्री अमोल ठाकरे, प्रांत संघटक विष्णू देशमुख, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद परांडे म्हणाले की, ‘जागर भक्तीचा’ हा कौतुकास्पद उपक्रम आहे. भगवान हनुमान भक्ती आणि शक्ती सामर्थ्याची देवता आहे.
हनुमान चालिसामध्ये काही ओळी येतात ‘कुमती सुमती के संगी’ म्हणजे दुर्बुद्धी दूर करून सद्बुद्धी वाढवली पाहिजे. सद्बुद्धी असलेल्या लोकांना एकत्रही केले पाहिजे. समाजातली ही सज्जनशक्ती एकत्र आली की देशकार्य अधिक प्रभावीपणे करता येते.
तत्पूर्वी, सुरुवातीला सहजयोग संस्थेतर्फे योगाभ्यास घेण्यात आला. शेवटी आरती करण्यात आली. संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, विजय फडणवीस, हनुमान चालिसा संयोजक खेमराज दमाहे होते.