नागपुर समाचार : नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका व शिक्षण विभाग नागपूर व मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन कविवर्य सुरेश भट सभागृहात सभागृह आयोजित करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे, ललित तपासे, संयोजक डॉ. वंदना बडवाईक, मराठी भाषा कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचे सचिव सपन नेहरोत्रा, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. मानसी कोलते, सुधास पारधी, प्रशांत मेश्राम यांनी मा. श्री. नितीन गडकरी यांची सोमवारी भेट घेतली. नितीन गडकरी यांनी या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारावे, अशी विनंती यावेळी आयोजन समितीतर्फे करण्यात आली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून अशा भाषिक साहित्य संमेलनांमुळे मराठी प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी आयोजन समिती सदस्यांना दिले. रमेश बक्षी यांनी सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले.