- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

हिंगणा समाचार : डॉ. उदय मोगलेवार अभिष्टचिंतन सोहळा २१ डिसेंबर ला

हिंगणा समाचार : हिंगणा नगरीमध्ये देणा व दुर्गा नदीच्या संगमावर बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. सुधाकर मोगलेवार यांनी आपल्या हयातीत श्री. संत गाडगे गाडगे महाराज महाविद्यालय या नावाच ने रोपट लावल त्या रोपटयाच्या संगोपनासाठी आणि संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी डॉ. उदय मोगलेवार यांनी आपल्या वहीलांना मोलाची सोबत केली.

वडिलाच्या निधनानंतर बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष या नात्याने ते मोठ्या प्रमाणात कष्ट घेत आहेत. कुणीही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये माणून त्यांना आर्थिक मदत करतात बहीलांचा वसा पुढे नेत्त विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतात. या अशा एका चिरतरुण, विलखुलास, कणखर, बाणेदार व्यक्तीमत्वाचे धनी डॉ. उदय मोगलेवार यांच्या एकसष्ठी निमित्त अभिष्ट चिंतनाचा सोहळा शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजक केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, दॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (पूर्वाध्यक्ष, अ.भा.म.साहित्य महामंडळ), उद्घाटक, मा. श्यामकुमार बर्वे (रामटेक मतदारसंघ), विशेष उपस्थिती अलका कुबल (सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री), प्रमुख उपस्थिती डॉ. भाऊ वायपार, प्रा. दिव्जया मारोतकर राहतील.

या प्रसंगी मा. सुधाकर अडबैले (शिक्षक आमदार) गाच्ন্য हस्ते ‘उदयश्री’ या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. तसेच नवनिर्वाचित आमदारांचा मा. समीर मेघे (आमदार), मा. विकास ठाकरे (आमदार), मा. कृपाल तुमाणे (आमवार), मा. अगोल मिटकरी (आमदार) यांवा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय व मा. प्रदीपली दाते (अध्यक्ष, वि.सा. संघ) यांच्या हस्ते स्याम देऊळकर (स्मृतीगंधा क्रिएशन अॅण्ड कम्युनिकेशन) निर्मित डॉ. उदय मोगलेवार यांच्या माहिती पटाचे प्रक्षेपण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *