▪️ बुद्ध मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत
नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपुरात आगमन होताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड.धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देवून तर माजी मंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे यांनी तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
याप्रसंगी पिरीपा चे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, सुभाष पारधी, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सतीश शिरसवान,एड राहुल झांबरे, शंकर मेश्राम, महेंद्र प्रधान, मोहिनी रामटेके, अनंत जगनीत, सुनील शिरसाट, संदीप बेले, प्रमोद तभाने, रमेश वानखेडे, सुनील तुर्केल, हिमांशू पारधी, नूतन शेंदुर्णीकर, वंदना भगत, नंदा गोडघाटे, प्रीती बहादुरे यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.ड