- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : MPSC परीक्षेत ‘महाज्योती’ची मैत्रेयी जमदाडे राज्यात मुलींमध्ये अव्वल

इतर मागास बहुजन कल्याण राजपत्रित अधिकारी पदावर होणार रुजू

नागपुर समाचार : दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर करीत आहे. उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेची मैत्रेयी अविनाश जमदाडे मुलींमध्ये राज्यात प्रथम स्थान आपल्या नावी केले. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या मूल्याधिष्ठित प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळाच्या जोरावर सावित्रीआई फुले यांची लेक असलेल्या मैत्रेयी जमदाडे ने आपल्या नावी कामगिरी केली आहे.  मैत्रेयी जमदाडे या मुलींने प्राप्त केलेल्या घवघवीत यशामुळे आज ती ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदावर रुजू होणार असल्याचा आनंद असल्याची महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली. 

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याची मला सुवर्ण संधी मिळाली. विशेष म्हणजे, एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण विभाग (राजपत्रित) अधिकारी पदाच्या परीक्षेत मी प्रथम स्थान मिळविल्याचा मला आनंद आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या बहुजन हिताच्या ध्येयास पूरक सेवा करण्याची संधी मला अधिकारी म्हणून या विभागात मिळत असल्याचा मला अभिमान असल्याचेही मैत्रेयी जमदाडे हिने सांगितले. पुढे बोलतांना मैत्रेयी जमदाडे ने सांगितले की, ‘महाज्योती’या संस्थेमार्फत मला पुण्यातील नामांकित एच. व्ही. देसाई स्पर्धा प्रशिक्षण केंद्र येथे मोफत मार्गदर्शन मला मिळाले.

तसेच ‘महाज्योती’ मार्फत विद्यावेतनातून अभ्यास करण्यास भरीव मदत मला मिळाली. यामुळे मला परीक्षेची तयारी करताना प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा मिळाली. एमपीएससी ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात मला मुख्य परीक्षेत 119 गुण व मुलाखतीमध्ये 50 पैकी 35 गुण (सर्वाधिक) गुण मिळवता आले. ‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील एमपीएससी विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. तसेच एच. व्ही. देसाई स्पर्धा प्रशिक्षण केंद्रातून मिळालेले वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे मला राज्यात अव्वल स्थान गाठता आले. या सर्व शैक्षणिक सहकार्याबाबत महाज्योती व एच. व्ही. देसाई स्पर्धा प्रशिक्षण केंद्राचे मी मनपूर्वक आभार मानत असल्याचे मनोगतही मैत्रेयी जमदाडे ने हिने व्यक्त केले. 

शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारांची चावी मिळविता येते. यानंतरच भविष्यात यशस्वी करियर घडविण्याचा मार्ग मोकाळा होत असतो. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे ‘महाज्योती‘ करीत आहे. त्यामुळेच आज मैत्रेयी जमदाडे या प्रशिक्षणार्थीनी ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्याच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक आपल्या नावी केले आहे. विशेष म्हणजे, मैत्रेयी जमदाडे ‘इतर मागास बहुजन कल्याण विभागातच अधिकारी म्हणून देशासह राज्याची सेवा करणार याचा अभिमान असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. तसेच श्री. राजेश खवले यांनी मैत्रेयी जमदाडेचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मैत्रेयी चे यश हे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची फलश्रृती : मंत्री अतुल सावे

महाज्योती मार्फत देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणामुळेच आज एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण विभाग (राजपत्रित) अधिकारी पदाच्या परीक्षेत मैत्रेयी जमदाडे या सावित्रीच्या लेकीने अव्वल स्थान प्राप्त केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभाग, तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर मा. ना. श्री. अतुल सावे मंत्री यांनी दिले. दिवसेंदिवस महाज्योतीचे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. त्यामुळेच आज मैत्रेयी जमदाडे हिची कामगिरी कौतुकास्पद असल्याचेही सावे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *