सिरोंचा समाचार : सिरोंच्यातील कालेश्वर महादेव मंदिरात आज नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. या निमित्ताने त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून देवाचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचरलावार, माधव कासरलावार, अमित त्रिपाठी, प्रकाश एरोला, श्रीधर आनकरी, तुषार एंडे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.