■ बेटर दॅन द ड्रीम्स पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
नागपूर समाचार : माझी मेट्रो देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ठ सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्य संस्कृती निर्माण केली असल्याचा गौरव पूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
येथील क्रॉस वर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या “बेटर दॅन द ड्रिम्स” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्य हस्ते झाले त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी अर्थ व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रिजेश दिशीत व्यासपीठावर उपस्थित होते.
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी तेनंतर दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यात येत असल्यामुळे जनतेलाही चांगल्या सेवा मिळणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणालेकी मेट्रो ने केलेल्या वैशीष्ट पूर्ण नियोजनामुळे देशातील इतर राज्यातूनही मागणी होत आहे मेट्रोमुळे नागपूर शहराच्या जीवनशैलीतही बदल झाला आहे. या परिवर्तनाची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.
राज्यातील पहिली मेट्रो मुंबईत सुरू झाली आणि ती अकरा वर्षात अकरा किलोमीटरचा टप्पा पूर्ण करु शकली परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच वर्षात तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.नागपूर मेट्रो चार वर्षात 32 किलोमीटर, दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे त्याप्रमाणेच पुणे मेट्रो सुद्धा अत्यंत जलद गतीने पूर्ण झाली असल्यसाचे सांगतांना श्री. फडणवीस म्हणालेकी या कामाचे श्रेय तत्कालीन प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे आहे.
मेट्रो ची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुण्याच्या मेट्रो चे काम या कंपणी मार्फतच सुरू करण्यात आले. पुणेकरांनी नागपूर कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का अशी शंका निर्माण केली त्यामुळे महामेट्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली.
प्रारंभी या पुस्तकाच्या लेखिका सरिता कौशिक यांनी नागपूर मेट्रोमुळे जीवनशैलीवर झालेल्या परिणामाची ओळख, वेगवेळ्या घटकातील लोकांवर परिणाम करणाऱ्या घटना, झालेला विकास तर तसे शहराचा इतिहास या या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचा यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पायाभुत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांनी नागपूर मेट्रो ची सुरुवात आणि त्या मागील संकल्पना आणि ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेटर दॅन ड्रिम्स या पुस्तकाच्या दुसऱ्या आवतीचे प्रकाशने केले. यावेळी नागपूर मेट्रो च्या विविध टप्यातील घटनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. स्वागत राजू अरोरा यांनी तर कार्यक्रमाचे संचालन निधी काळे यांनी केले.