■ बुद्धविहारासाठी आर्थिक मदत
चंद्रपूर समाचार : मौजा निमगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील भाजपचे तालुका सचिव मुक्तेश्वर थोराक व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली येथील निवासस्थानी मा. खा.तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत निमगाव येथील आंबेडकर चौकातील (सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब, रमाबाई आंबेडकर) बुद्धविहाराच्या बांधकामासाठी मदतीचा विषय समोर आला. या निमित्ताने मा. नेते साहेबांनी बुद्धविहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली. या मदतीमुळे बुद्धविहाराचे बांधकाम लवकर पूर्ण होईल आणि स्थानिक समाजाला याचा मोठा फायदा होईल, असे सांगण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, बुद्धविहाराचे कार्यकर्ते नामदेव गेडाम, विनायक खोब्रागडे, कुसन गेडाम, राजू शेंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नेते साहेबांच्या या सहकार्यामुळे स्थानिकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजासाठी प्रेरणादायी योगदान
नेते साहेबांचे हे योगदान समाज उभारणीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. बुद्धविहाराच्या माध्यमातून समाजाला सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.