■ ३१ वा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा
नागपूर समाचार : Orange City Craft Fair राष्ट्रीय स्तरावरील ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आणि महोत्सवाचे आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने करण्यात आले आहे. १० ते १९ जानेवारी दरम्यान होणार्या या महोत्सवात विविध राज्यांतील २०० हून अधिक कलाकार नृत्य आणि हस्तशिल्पाच्या माध्यमातून आपल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत. सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
दररोज २ ते ९.३० दरम्यान हस्तकला मेळावा आयोजित केला असून सुमारे १५० कलाकार यात सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी ६.३० वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचे नेत्रदीपक सादरीकरण होईल. १० ते १३ जानेवारी दरम्यान सायंकाळी ६.३० पासून होजागीरी नृत्य (त्रिपुरा), मयूर चारकुला (उत्तर प्रदेश), कालबेलिया (राजस्थान), मस्करात (पुद्दुचेरी), भांगडा (पंजाब) आणि गोटीपुआ (ओडिशा) या नृत्यांचे सादरीकरण आहे.
१४ ला सायंकाळी Orange City Craft Fair ६.३० वाजता महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. १५ ला एसव्हीके शिक्षण संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी ‘भारतीय लोक आणि आदिवासी नृत्य शैली’ वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. यानंतर निकालस महिला महाविद्यालयाद्वारे ‘कॅनवास टू कॅटवॉल’ सादर होणार आहे. मुंबई स्थित लोकगीत गायिका डॉ. शैलेश श्रीवास्तव या भारतीय पारंपरिक लाकगीतांचेे सादरीकरण करणार आहे.
१६ ते १९ दरम्यान Orange City Craft Fair संध्याकाळी घूमर/फाग (हरियाणा), सिद्धी धमाल (गुजरात), करकट्टम (तामिळनाडू), रऊफ (जम्मू काश्मीर) आणि अफिलो कुवो (नागालँड) आणि सिंघी छाम (सिक्कीम) ही लोकनृत्य सादर होणार आहे. त्याचबरोबर १० ते १५ दरम्यान कच्छी घोडी आणि १६ ते १९ या कालावधीत बहुरूपी (राजस्थान) कलाकार विविध वेशभूषेत सादरीकरण करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. पत्रपरिषदेला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर, दीपक कुलकर्णी, दीपक पाटील, गजानन प्रजापती, श्वेता तिवारी आदी उपस्थित होते.