नागपूर समाचार : महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, नागपुर व शब्दकृती फाउंडेशन पाच्या संयुक्त विद्यामाने नागपुर नगरीत अतिरुद्ध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचा उद्देश मानव समृद्धी व वैश्विक शांती आहे. वानाडोंगरी स्थीत सत्यसाई ग्रामीण सेवा केन्द्र, वसंत विहार, येथे हा यज्ञ ३० जाने. २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहील १२ फरवरीला दुपारी १२.३० वा यज्ञाची पूर्णाहूति सम्पन्न होईल.
या निमित्त सामाजिक व आध्यात्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यज्ञस्थानी भेट देतील या यक्षात पौरोहित्य करण्यासाठी आआंध्रप्रदेश, कर्नाटक व वाराणसी येथून पुरोहित येतील, एकुण १५० पुरोहीतांच्या मार्गदर्शना खाली हा यज्ञ सम्पन्न होईल.
या निमित्त ११ यज्ञ कुडावर ४४ यजमान रोज सम्मिलित होतील ११ दिवस हा यज्ञ बालेल ज्यात ४८४ यजमान सम्मिलित होतील व १४६४१ रूद्रांचा पाठ व दशाश हवन होईल. विविध विषयांवर किर्तन, प्रवचनांच्या द्वारे समाज प्रबोधन केले जाईल. दुपारी १२.३० ते २ व रात्री ८ ते १० महाप्रसादाची व्यवस्था राहील.
या पवित्र कार्यात समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे व पुण्य लाभ प्राप्त करावा हि विनंती ज्या भक्तांना यज्ञात सहभावी व्हावयाचे आहे त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क करावा समिती तर्फे अशी विनंती सर्वश्री गणेश चक्करवार, राजु मुक्कावार, मनोज गोलावार, अजय निल्डाबार, गिरीराज चौहान, नरेन्द्र खवळे, नितिन मुकेवार, अतुल गोलवार, विनोद भाकरे कृष्णाल गोलाबार, परिणीती माथुरकर, प्रितेश माधुरकर, आदित्य पवार, तुषाली माथुरकर यांनी केली आहे.