शिर्डी समाचार : शिर्डी येथील भारतीय जनता पक्षाच्या महाविजयी प्रदेश अधिवेशनाला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या अधिवेशनात अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
अधिवेशनात भाजपा प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते संजयजी भेंडे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांची विशेष उपस्थिती होती.
अधिवेशन कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. अधिवेशनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.अमितभाईंनी आपल्या प्रभावी भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व नवा जोम निर्माण झाला.
कार्यक्रम संपल्यानंतर मा. खा. अशोकजी नेते आणि उपस्थित मान्यवरांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी साई संस्थानच्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी कार्यालय प्रमुखांनी मा.खा. नेते साहेबांचे स्वागत साईबाबांची प्रतिमा,शाल व श्रीफळ देऊन केले. या स्वागतामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.