नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी संघाने दमदार विजयी सुरुवात केली. मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरु आहे. रविवार 12 जानेवारी रोजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी संघाने पुरुष आणि महिला दोन्ही गटात विजय नोंदविला. पुरुष गटात मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी संघाने शिकना कबड्डी संघ उमरेड संघाचा 57-26 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. तर महिला गटात मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी संघाने सीकेसी पाचगाव उमरेड संघावर 42-5 असा एकतर्फी विजय मिळविला.
यापुर्वी नागपूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्री. मदन रतन, श्री. अनील गुळमुळे, डॉ. विवेक अवसरे, श्री. विनय कडू, श्री. प्रदीप सेलोकर यांच्या उपस्थितीत विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन झाले.
खासदार क्रीडा महोत्सव निकाल, विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा, इनडोअर स्टेडियम मानकापूर
पुरुष
1. सुवर्ण भारत खापरखेडा (35) मात शिवशक्ती क्रीडा मंडळ लाडगाव काटोल (12)
2. रायजिंग सेव्हन क्रीडा मंडळ हिंगणा (36) मात दादासाहेब बालपांडे कॉलेज बेसा (16)
3. तरुण मित्र क्रीडा मंडळ बोरगाव (37) मात शिवराज स्पोर्टींग क्लब हिंगणा (27)
4. मराठा लॉन्सर्स धरमपेठ नागपूर (32) मात एकता स्पोर्टींग क्लब कळमेश्वर (11)
5. केशरी क्रीडा मंडळ कळमेश्वर (27) मात टिम डी.जी. शांतीनगर नागपूर (7)
6. एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर (34) मात जय हनुमान क्रीडा मंडळ टेकाडी (4)
7. सुभाष क्रीडा मंडळ रानाळा (30) मात न्यू ताज क्रीडा मंडळ टेका नाका नागपूर (20)
8. मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी (57) मात शिकना कबड्डी संघ उमरेड (26)
9. विद्यार्थी युवक जुना सुभेदार नागपूर (31) मात युवा शक्ती पाटण सावंगी (5)
महिला
1. केशरी क्रीडा मंडळ कळमेश्वर (32) मात महाराणा प्रताप गडचिरोली (29)
2. साईराम क्रीडा मंडळ रामटेक (34) मात विद्यार्थी युवक जुना सुभेदार नागपूर (16)
3. संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर (36) मात शिव गर्जना क्रीडा मंडळ रामटेक (9)
4. मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी (42) मात सीकेसी पाचगाव उमरेड (5)
5. सिटी पोलीस नागपूर (25) मात विक्रांत स्पोर्टींग क्लब नागपूर (17)