- Breaking News, राजनीति, विदर्भ

अहेरी समाचार : अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजपाच्या सदस्यता अभियानाला प्रतिसाद

■ अहेरीतील चहाच्या टपरीवर महबूब खान पठाण सोबत ‘चाय पे चर्चा’

अहेरी समाचार : अहेरी शहरातील मेहबूब खान पठाण यांचे नवाजलेले चहाचे दुकान ‘चायवाले’ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी भेट देऊन ‘चाय पे चर्चा’ केली. या भेटीत त्यांनी भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत ‘घर चलो’ मोहिमेबद्दल संवाद साधला.

मेहबूब खान पठाण यांनी केले पंतप्रधान मोदींच्या कार्याची स्तुती…

या वेळी मेहबूब खान पठाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. देशाच्या अंतर्गत सुरक्षेपासून ते विविध समाजघटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कार्याचा गौरव करताना त्यांनी आनंद व्यक्त केला. या चर्चेदरम्यान मेहबूब खान पठाण यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होत भाजप पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी त्यांनी अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाचाही गौरव केला.

अहेरीत भाजपात उत्स्फूर्त पक्षप्रवेश: नेते यांच्या नेतृत्वाला पाठिंबा

माजी खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली अहेरीत भाजपाच्या सदस्यता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रातील व राज्यातील भाजपाच्या यशस्वी कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी विशेषतःमाजी सरपंच रमेश मडावी चिंचोगुंडी, संजय मडावी वांगेपल्ली, संतोष मडावी अहेरी,राजू पेंंदाम,नरेंद्र दुर्गे, तसेच अन्य कार्यकर्त्यांनी व तरुणवर्गाने मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. भाजपाचा दुपट्टा परिधान करत नव्याने सहभागी झालेले कार्यकर्ते पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान उपक्रमांमध्येही सक्रिय योगदान देण्यात उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले.

अहेरी परिसरात भाजपाचे विस्तार आणि नेते यांचे नेतृत्व ही स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. चहाच्या टपरीवरील साध्या चर्चेतूनही जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेताना नेते यांनी पक्षवाढीसाठी केलेली मेहनत स्पष्टपणे दिसून आली.

यावेळी प्रामुख्याने सोबत जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी आकनपल्लीवार,तालुका अध्यक्ष संतोषजी मद्दीवार, शहराध्यक्ष मुकेश नाम्मेवार,.ता.महामंत्री सुकमा हलदार,रमेश समुद्रवार यांसह अहेरीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *