- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव ॲथलेटिक्स स्पर्धा; प्रणय माहुले, मिताली भोयर ठरले वेगवान धावपटू

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 1500 मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये प्रणय माहुले आणि मिताली भोयर हे पुरुष आणि महिलांमध्ये वेगवान धावपटू ठरले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर बुधवारी (ता.15) 1500 मीटर अंतराची शर्यत पार पडली.

स्पर्धेमध्ये पुरुष गटात आर्ट्स कॉमर्स नाईट कॉलेजच्या प्रणय माहुलेने 4:08.11 मिनिटात निर्धारित अंतर पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकाविले. ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स क्लबचा समित टोंग ने उत्तम झुंज देत 4:08.48 मिनिट वेळ नोंदवित रौप्य पदक पटाविले तर नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या गौरव खोडतकर ने 4:11.00 मिनिट वेळ नोंदवित कांस्य पदक प्राप्त केले.

महिलांच्या शर्यतीत ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या मिताली भोयर ने 5:24.26 मिनिटात 1500 मीटर अंतर पूर्ण करीत सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली. खेल फाउंडेशन नागपूरची अंजली मडावी 5:24.82 मिनिटासह दुसऱ्या आणि वीर राष्ट्रीय क्रीडा अकादमीची प्राची पिकलमुंडे (5:51.08 मि.) तिसऱ्या स्थानावर राहिली.

निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)

भालाफेक

18 वर्षाखालील मुली

मानसी पाटणकर (ट्रॅक स्टार ॲथलेटिक्स) 26.75 मी., रोशनी इवनाती (माधव स्पोर्टिंग क्लब) 22.66 मी., खुशबू माणिकपुरी (डीएके एमव्ही) 20.60 मी.

लांब उडी

12 वर्षाखालील मुली

अमेलिया मार्टिन (रायझिंग स्प्रिंटर क्लब) 4.12 मी., कार्तिकी दर्पद (अ‍ॅथलेटिक्स क्लब अमरावती) 3.91 मी., रिया पुरणकर (वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी) 3.89 मी.

18 वर्षाखालील मुले

गीत चिंतनवार (वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी) 6.00 मी., मनीष सहादा (देवरी पीओ) 5.67 मी., नेव्हिल कृष्णन (फ्युचर अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स) 5.55 मी.

1500 मीटर दौड

पुरुष (खुला गट)

प्रणय माहुले (आर्ट्स कॉमर्स नाईट) 4:08.11 मि., समित टोंग (ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स) 4:08.48 मि., गौरव खोडतकर (नवमहाराष्ट्र क्रीडा) 4:11.00 मि.

महिला (खुला गट)

मिताली भोयर (ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स) 5:24.26 मि., अंजली मडावी (खेल फाउंडेशन नागपूर) 5:24.82 मि., प्राची पिकलमुंडे (वीर राष्ट्रीय क्रीडा) 5:51.08 मि. 

110 मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स)

पुरुष (खुला गट)

नयन सरदे त्रक्रीडा प्रबोधिनी) 15.88, भावेश मनकवडे (रायझिंग स्प्रिंटर क्लब) 17.15, हर्ष बावनकर (लक्षमेध फाउंडेशन) 19.26.

18 वर्षाखालील मुले

राहुल राऊत (लक्ष्मी फाउंडेशन) 15.86, पल्लवी जोगी (माधव स्पोर्टिंग) 16.03, कृष्णा रोहणे (टिम) 16.52

तिहेरी उडी

पुरुष (खुला गट)

नितीन दोरखंडे (खेल फाउंडेशन नागपूर) 13.32 मी., आर्यन जांभुळे (खेल फाउंडेशन नागपूर) 13.13 मी., प्रज्वल माहुरे (ॲथलेटिक्स क्लब अमरावती) 12.78 मी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *