- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर, आता ड्रोनद्वारे पाळत – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

■ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे कडक कारवाईचे निर्देश, विशेष बैठकीत घेतला आढावा

नागपूर समाचार : अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा घालण्यासाठी व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. वाळूघाट व गौण खनिज संदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्री. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड आदी उपस्थित होते.  

ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिध्द करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल. याच बरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. वर्धित सुरक्षितेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या सहाय्याने तपासणीसाठी लागणारा वेळ आणि संसाधने ड्रोन तंत्रज्ञानातून मोठ्या क्षेत्राचे गतीने अचूक सर्वेक्षण करू शकतात. यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. 

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 40 वाळूघाट आहेत. या घाटावरुन यापुढे वाळूची तस्करी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळूघाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *