नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (७ सप्टेंबर) ला मास्क न लावणा-या ५०१ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. मागील चार दिवसात शोध पथकांनी ११३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २,२७,२००/- चा दंड वसूल केला आहे.
नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृतांची संख्यासुध्दा झपाटयाने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना महापौर श्री. संदीप जोशी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी वारंवार केली आहे. तरीपण नागरिकांनी त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे जवानांनी कारवाई करुन दंड वसूल केला.