■ ग्रामायण उद्यम एक्स्पोत पथनाट्य आणि पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल
■ शालेय विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा
नागपूर समाचार : ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने यंदा अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ १६ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी शनिवार, दिनांक 18 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध पर्यावरणपूरक स्पर्धांचा निकाल जाहीर व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेन दस्तुरे होते, यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे होते. ही स्पर्धा पर्यावरण संवर्धन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरली.
स्पर्धेत टीबीआरएएनन्स मुंडले इंग्लिश हायस्कूल, संस्कार विद्यासागर देव नगर स्कूल, बाबा नानक सिंधी हिंदी कॉलेज आदी संस्थेतील सहभागी विद्यार्थ्यांचे सादरीकरण करण्यात आले. इकोब्रिक्सपासून तयार केलेल्या वस्तू, मातीविरहित बाग, पथनाट्य आणि पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल तसेच “पर्यावरणपूरक शाळा” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे सादरीकरण झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे देवेन दस्तुरे यांनी ही अद्भुत स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या “लोकल फॉर वोकल” या मंत्राला प्रेरित केल्याचे सांगत ही स्पर्धा आयोजन केल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, या प्रदर्शनात वेगवेगळ्या हस्तकलेचे नमुने पाहायला मिळाले, ज्यामध्ये छत्तीसगड येथील दंतेवाडा येथून आलेल्या कलाकारानी हाताने बनवलेल्या वस्तू विशेष आकर्षण ठरल्या. हे पाहून प्रेरणा मिळाली. पंतप्रधानांनी नेहमीच आत्मनिर्भर भारत आणि आकांक्षावान भारताची संकल्पना पुढे केली आहे, आणि आज इथे उपस्थित मुलांनी दाखवलेली रचनात्मकता आणि समर्पण हे त्याचाच एक भाग आहे, असल्याचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थांनी पहिल्या पथनाट्यामध्ये प्लास्टिक मुक्त भारताचे महत्व मांडले. प्लास्टिक फ्री मोहिमेसाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. शरीरासाठी प्लास्टिक नुकसानकारक आहे तसेच पृथ्वीमातेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणस्नेही व बायोडिग्रेडेबल वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, असा संदेश दिला. दुसऱ्या पथनाट्यात स्वच्छता आणि पाण्याच्या महत्वावर भर दिला गेला. पर्यावरणासाठी जलसंधारण हा अतिशय महत्त्वाचा विषय असून, पृथ्वीवरील केवळ 3% पाणी हे मानवी उपयोजनासाठी योग्य आहे. समुद्राचे पाणी उपयुक्त नाही, त्यामुळे पाणी वाचविणे आवश्यक आहे, असा संदेश देत शहरांमध्ये दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. आपण पाणी वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध पर्यावरणपूरक स्पर्धांचा निकाल जाहीर करत बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामायण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत रागीट, शेफाली दुधाबळे, आणि डॉ. शालिनी हेडाऊ, कल्पना रसिक गुलालकरी, ऐश्वर्या चुटे, कविता पांडे, अभिजीत राऊत यांनी परीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाचे संचालन….. यांनी तर आभार …. यांनी मानले.
इको ब्रिक्स स्पर्धेचे विजेते:
पहिला क्रमांक: सोमलवार हायस्कूल नागपूरचे आदिनाथ देशपांडे
दुसरा क्रमांक: सोमलवार हायस्कूल नागपूरची रिया चेतन ठाकूर
तिसरा क्रमांक: सोमलवार हायस्कूल नागपूरचे अमोघ पेशकर
गच्चीवरील मातीविरहित बाग स्पर्धा:
पहिला क्रमांक: रिदान कार्तिक उत्तरवार
दुसरा क्रमांक: अनन्या अतुल कोफे
तिसरा क्रमांक: अस्मी खापरे
पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल स्पर्धा:
पहिला क्रमांक: अथर्व बागडे
दुसरा क्रमांक: वशिष्ठ शाहू आणि विकी आंबोरे
तिसरा क्रमांक: यश चौधरी आणि जयेश कोसरे
पथनाट्य स्पर्धा:
पहिला क्रमांक: बाबा नानक सिंधी हिंदी स्कूल
दुसरा क्रमांक (विभागून): टीबीआरएएनन्स हायस्कूल नागपूर आणि संस्कार विद्यासागर हायस्कूल