अमरावती समाचार : अनाथ, बेसहारा, शिकार करणात्या भिक मागणाऱ्या अशा फासेपारधी समाजाच्या मुलांची शाळा असलेल्या प्रत्रचिन्ह आदिवासी आश्रमशाळेमध्ये दिनांक २३ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान अतिसहाय भव्य दिव्य स्वरुपात पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक श्री. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर सुप्रसिद्ध कवी तथा लेखक श्री अनंत राऊत यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तसेच या पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ साहित्यिक श्री. दगडू काका लोमटे, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचे लेखक श्री. अरविंद जगताप, युवा दिग्दर्शक श्री. मल्हार नाना पाटेकर, सामाजिक कार्यकर्त्या ममताताई सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अरुंधती भालेराव आदींची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.
या पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातील शाळांमधील अनेक विद्यार्थी त्यांच्या स्वरचित कथा, कविता, व इतर साहित्य कलाकृती सादर करण्यासाठीं या पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात सहभाग घेतील. सर्व साहित्य प्रेमींनी या पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा संस्थापक तथा आदिवासी फासेपारधी समाजसेवक श्री मतीन भोसले यांनी केले आहे.