नागपूर समाचार : धनोजे कुणबी समाज विकास महासंघ नागपूर ही एक सामाजिक संस्था असून धर्मदाय उप आयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी झाली आहे. या समाजाच्या अजूनही काही संस्था नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून २५
जानेवारी २०२५ ला ‘संताजी सांस्कृतिक सभागृह’ सक्करदरा, नागपुर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अतिथी म्हणून माननीय आमदार मोहन मते, मा. आ सुधाकर अडबाले. मा. आ. देवराव भोंगळे, मा. अशोकराव जिवतोडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार व ईतर गुणवंत समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे