नागपूर समाचार : श्री हनुमान सेवा पंच कमेटी शिवशक्तीनगर नंबर २ व ३ येथील श्री हनुमान सेवा पंचकमेटी तर्फे श्रीराम दरबार व विठ्ठल रूख्मिणी मूर्तीची प्रथमच वर्धापन दिवस सोहळा साजरा करण्यात आला. आयोजकांच्या वतीने मूर्तींची पुजा अर्जना व अभिषेक व महाआरती करण्यात आली नंतर दुपारी १२ ते २ या वेळेत भजन व गोपालकाला झाला. त्यानंतर भव्य पालखी सोहळ्यात वस्तीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मूर्तीच्या दर्शनासाठी रांग लागली होती. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन प्रथम वर्धापन दिवस अतिशय आनंदात सर्व भक्तांनी आनंद द्विगुणित केला. श्रीराम दरबार व विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठापना प्रथम वर्षपूर्ती सोहळा साजरा केला व भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन शिवशक्ती नगर, सरस्वती नगर व महाकाली नगर चौकातून मंदिरात परत आली. त्यांनंतर पालखी समाप्त झाल्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री हनुमान सेवा पंच कमेटी शिवशक्तीनगर नंबर २ व ३ नगरातील समस्त राम भक्त व सदस्य मोठया संख्येने या उत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते.