गडचिरोली समाचार : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सह-पालकमंत्री मा.ना. श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या गडचिरोलीतील आगमनाने जिल्ह्यात उत्साहाची लाट उसळली आहे. आज दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. अशोकजी नेते यांनी मंत्री जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे जंगी स्वागत केले.
याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडी प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
राज्यमंत्री जयस्वाल यांच्या या भेटीद्वारे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी आशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.