मनपा आयुक्तांचे आदेश : मेडीकल चौक ते तुकडोजी पुतळा मार्गावरील वाहतूक १५ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधित
नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत मेडीकल चौक ते तुकडोजी पुतळा मार्गापर्यंतची वाहतूक सीमेंट रोडचा बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ६ मधील रस्ता क्रमांक २२ मेडीकल चौक ते तुकडोजी पुतळापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील डाव्या बाजूची वाहतूक १० सप्टेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार आहे.
सदर मार्गावरील वाहतूक उजव्या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त यांनी दिले आहेत.