गडचिरोली समाचार : भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने संस्कार संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात हळदी-कुंकू कार्यक्रम व स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, माजी सभापती तथा जिल्हा सचिव रंजीताताई कोडाप,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी तसेच मोठ्या संख्येने अनेक महिला भगिनीं मान्यवर उपस्थित होते.
हळदी-कुंकू: संस्कृतीचा वारसा
हळदी-कुंकू हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून, मकर संक्रांतीनंतर महिलांना एकत्र आणणारा सण आहे. या निमित्ताने महिला आपले दुःख विसरून एकत्र येतात, स्नेह वाढवतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात. यावेळी महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह नृत्य व भारुड सादर करण्यात आले.
महिलांच्या प्रगतीसाठी भाजपा सरकारचा पुढाकार मा.खा.नेते
या कार्यक्रमात उद्घाटन स्थानावरून बोलताना माजी खासदार अशोकजी नेते यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्य सरकारांनी महिलांच्या सन्मानासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना लागू केल्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या जीवनमान उंचावण्यासाठी क्रांतिकारक ठरली आहे.”
त्यांनी पुढे संत तुकाराम महाराज यांचा संदर्भ देत म्हटले, “बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले.” अशा प्रकारचे सरकार महिलांच्या सन्मानासाठी कार्यरत आहे, त्यामुळे महिलांनी या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन मा.खा.नेते यांनी केले.
कार्यक्रमाचा उत्साह
या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. त्याचबरोबर महिलांच्या सहभागाने स्नेहसोहळा अधिक रंगला. महिलांच्या कलागुणांचे सादरीकरण, स्नेहाची देवाणघेवाण आणि संस्कृतीचा सन्मान, यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
हळदी-कुंकू स्नेहसोहळा केवळ परंपरा जपण्याचा कार्यक्रम नव्हता, तर समाजात महिलांच्या सन्मानाचे प्रतीक ठरला.