नागपूर समाचार : श्रीजी लेडीज क्लब आणि डायनामिक फिटनेसतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी वृंदाताई ठाकरे यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
विशेष अतिथी म्हणून सोनिया परमार (नागपूर लेडीज क्लब), ज्योती द्विवेदी (आपला लोकशाही), विजेता तिवारी (आसरा रिअल्टर्स), पूनम गोकुलपुरे (पूनम प्रोडक्शन) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा बिसेन (श्रीजी लेडीज क्लबच्या संस्थापक) आणि रूपाली विक्टर (डायनामिक फिटनेस) यांनी केले. श्रीजी लेडीज क्लब आणि डायनामिक फिटनेसतर्फे कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर असलेल्या देशोन्नती प्रेसचे आभार मानण्यात आले.