नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी शिवसेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिध्दु कोमजवार आणि आशिर्वाद नगर येथील जेष्ठ नागरिक, गार्डन क्लबचे अध्यक्ष वामनराव साळवे व सदस्यांनी आशिर्वाद नगरातील समस्यांचे लिखित पत्र दिले व प्रभाग क्रमांक ३० साठी, ३ करोड रुपयाची निधीची मागणी केली.
मा.नितीनजी ने प्रभागातील विविध कामांसाठी १ करोड निधी ची मागणी मंजुर केली असून सुद्धा आश्वासन दिले की, त्या प्रभागात कोणतेही काम असेल तर त्याचेही मला निवेदन द्यावे. मी लवकरात लवकर पूर्ण करणार अशी ग्वाही दिली. त्याबद्दल गडकरींचे खूप खूप आभार मानले. याप्रसंगी गार्डन चे कोषाध्यक्ष विजयजी कडु, विलास इटनकर व भानुदास खेडकर, सिध्दु कोमजवार व गार्डन मधील अनेक सदस्यायांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.