चामोर्शी समाचार : भाजपाचे कट्टर कार्यकर्ते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी खासदार अशोकजी नेते यांचे विश्वासू सहकारी स्व. स्वप्निल श्रीरामजी वरघंटे यांचे दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तेलंग मोहल्ला, चामोर्शी येथे प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून स्व. वरघंटे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे अभिवादन केले.
याप्रसंगी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, नगरसेविका रोशनीताई वरघंटे, श्रावणजी सोनटक्के तसेच मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्व. स्वप्निल वरघंटे यांच्या समाजसेवा व भाजपासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, त्यांची आठवण कायम स्मरणात राहील, असे विचार मा.खा.अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.