■ आमदार समीर कुणावार यांचे पाठपुराव्याचे फलित
हिंगणघाट समाचार : जिल्ह्याचे सीमेवरील पोहणानजीकच्या वर्धा नदीवरील रोहिणी घाटावरील वर्धा-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाकरिता मा. ना. नितीन गडकरी यांनी सुमारे ३८ कोटी रुपये मंजूर केले आहे.
विधानसभा आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे या पुलाचा मोठा अडथळा दूर होणार असून सी.आर. एफ फंडातून हा विशेष निधी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे.
उपरोक्त पुलामुळे हिंगणघाट तालुक्यातील पोहना मार्गे यवतमाळ करिता येवती येथून रस्त्याची अधिक चांगली सुविधा वाहना चालकांना मिळणार आहे.
सी आर एफ खंडातून ना.गडकरी यांनी हा मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे आमदार समीर कुणावार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. लवकरच या विकास कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी दिली.