नागपुर : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ५८५५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. १२,८६,५००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ४२, हनुमाननगर झोन अंतर्गत २२, धंतोली झोन अंतर्गत १६, नेहरुनगर झोन अंतर्गत २२, गांधीबाग झोन अंतर्गत १७, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ६, लकडगंज झोन अंतर्गत १५, आशीनगर झोन अंतर्गत ८, मंगळवारी झोन अंतर्गत ४७ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.