नागपूर समाचार : कोरोनाने शहरात हाहाकार माजवला आहे. गेल्या पंधरा दिवसात मृत्यूदरही वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात तुकाराम मुंढेंना परत आणण्याची मागणी माजी महापौर किशोर कुमेरिया यांनी केली आहे. विशेष म्हणजे संदर्भातले पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे कुमेरिया यांनी पाठवले आहे.
शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढते आहे. नागपूरची स्थिती भयंकर झाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर एकच पर्याय असल्याचे किशोर कुमेरिया यांना वाटते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात रुजू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
शहरातून तुकाराम मुंढे यांची मनपा आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली. दुसरीकडे वैधकिय सेवेत रुग्णांची प्रचंड लूट सुरू आहे. त्यामुळे आज नागपूरच्या जनतेलाला तुकाराम मुंढे यांची आठवण झाली आहे. नागपूरची परिस्थिती हाता बाहेर चालली आहे. साधारण जनतेची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.