नागपूर : आज दिनांक ३ डिसेंबर २०२० गुरुवार ला १:३० वाजता संविधान चौक येथे आम आदमी पक्षातर्फे नव्या कृषी कायद्याविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण मिळावे आणि आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आले.
पंजाब, हरियाणा आणि देश्यातील विविध शेतकरी संघटना मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. त्यांच्या समर्थनार्थ नागपूर तसेच संपुर्ण महाराष्ट्रात आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन आणि निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले.
“आपदा मध्ये अवसर” शोधणाऱ्या जुलमीं केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताच्या जोरावर भांडवलंदारांचे हित लक्षात ठेवून शेतकरी विरोधी तीन विधेयक पास करवून घेतले. त्याविरोधात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि देश्यातील विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार विरोधात देशव्यापी समर्थन करण्याकरिता एल्गार पुकारलेला आहे.
दिल्लीच्या राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्या निषेधार्थ आज विरोध प्रदर्शन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्र्यालयाच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टी कडे दिल्लीतील बुराडीच्या मोठ्या स्टेडियमवर जेल बनवून त्यात शेतकऱ्यांना बंदिस्त करण्यासाठी परवानगी मागितली होती. आम आदमी पार्टीने या कृतीचा निषेध करून ती देण्यास नकार दिला याबद्दल मा. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्रिमंडळाचे आभार मानण्यात आले. दिल्ली राज्याच्या सर्व सीमा भागांत थंडीत आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यांना आम आदमी पार्टीच्या सरकारकडून सर्व मदत देण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे सर्व राष्ट्रीय नेते तसेच राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनीजमिनीवर उतरून शेतकऱ्यांसोबत आहोत हे दाखवून दिलेले आहे.
शेतकरी कायदा रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या आंदोलनात आम आदमी पार्टीने पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे.
या आंदोलनाला राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय समिति सदस्य अमरीश सावरकर, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सहसंयोजक प्रशांत निलाटकर, स्वीटी इंदुरकर, दिपाली पाटील, हेमंत दिवाने, जयप्रकाश पवनीकर, अमोल हाडगे, विवेक छापले, संजय चांदेकर, मोरेश्वर मोदीकर, आकाश कावळे, गिरीश तितरमारे, विश्वजीत मेश्राम, सुरेश चतुर्वेदी, राहुल कावले, हरीश गुरुवाणी, रोशन डोंगरे, शालिनी अरोरा, राजेश तिवारी, विनोद आलमडोलकर, अलका पोपटकर, प्रभात अग्रवाल, सचिन पारधी, रविकांत वाघ, हरीश गणवीर, अजय दाबणे, अंबारीस सावरकर, राजेश भोयार, रेणू, निखिल भेंडवडे, प्रतिक बावनकर, कृतान वेलेकर, हेमंत बनसोड, प्रीतम टेंबुरणे, सौरभ तागोरे, शशिकांत रायपुरे, विजयानंद रायपुरे प्रियंका हाडके, वैशाली डोंगरे, माधुरी रहाटे, संजय सिंग पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.