नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर व विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली.
दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला आज पहाटे सुरुवात करण्यात आली आहे. पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत. पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे. अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०.