नागपूर : जवळपास ५० वर्षानंतर नागपूर पदवीधरची जागा भाजपनं गमावली. महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव केला. भाजपसाठी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का.
नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे ॲड अभिजित वंजारी विजयी. सकाळी 9.30 ला प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार.
नागपूर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडीचे अभिजित वंजारी यांना 56155, तर भाजपाच्या संदीप जोशी यांना 41622 मते.