नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (४ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १४० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २२५५० नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ९६,३४,०००/- चा दंड वसूल केला आहे.
शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २५, धरमपेठ झोन अंतर्गत २०, हनुमाननगर झोन अंतर्गत २५, धंतोली झोन अंतर्गत ९, नेहरुनगर झोन अंतर्गत ६, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ६, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १२, मंगळवारी झोन अंतर्गत १६ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १७०८० बेजबाबदार नागरिकांकडून रु ८५ लक्ष ४० हजार वसूल करण्यात आले आहे.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३,४७३ नागरिकांकडून रु. १४५९०००, धरमपेठ झोन अंतर्गत ४,३८७ नागरिकांकडून रु. १६२८०००, हनुमाननगर झोन अंतर्गत २,५७१ नागरिकांकडून रु.१०३२०००, धंतोली झोन अंतर्गत १,६३७ नागरिकांकडून रु.५०३०००, नेहरुनगर झोन अंतर्गत १,२३१ नागरिकांकडून रु.४५६०००, गांधीबाग झोन अंतर्गत १,४३० नागरिकांकडून रु. ५४५५००, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १,४१३ नागरिकांकडून रु.५३९०००, लकडगंज झोन अंतर्गत १,२१४ नागरिकांकडून रु.४४५५००, आशीनगर झोन अंतर्गत २,२१६ नागरिकांकडून रु.७९९०००, मंगळवारी झोन अंतर्गत २,७११ नागरिकांकडून रु. १०२०००० आणि मनपा मुख्यालयात २६७ नागरिकांकडून रु.११३००० जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.