धानाला 700/- बोनस मंजुर झाल्यामुळे खा. पटेल यांचे आभार
विदर्भ समाचार : साकोली येथे तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान, साकोली येथे संपन्न झाला. मेळाव्यात पक्षाचे नेते व वरिष्ठ पदाधिकारी जिला अध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुध्दे, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, महिला जिलाध्यक्ष श्रीमती सरिता मदनकर, युवक जिलाध्यक्ष श्री यशवंत सोनकुसरे, युवती जिलाध्यक्ष एड. नेहा शेंडे व अन्य मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. बैठकीत मान्यवरांनी आपले मत व्यक्त करतांना या वेळी आगामी जिला परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत च्या निवडणूकीत प्रामुख्याने साकोली तालुक्यातुन जास्तीत जास्त उम्मेदवार व प्रतिनिधी निवडले पाहिजे तसेच तालुक्यात पक्ष संगठनेच्या मजबुती साठी प्रत्येक कार्यकर्तांनी लक्ष देऊन एकजुटीने कामाला लागावे, असे मत व्यक्त करण्यात आले.
खासदार श्री पटेल यांच्या प्रयत्नामुळे परिसरात सिंचन, आरोग्य, शिक्षा व इतर कित्येक क्षेत्रात अनेक विकासाची कामे झालेली आहेत. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनानी धानासाठी 700/- रुपये बोनस जाहिर केल्यामुळे या बैठकीत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. पक्षाचे नेते जिला बैंक अध्यक्ष श्री सुनिल फुंडे यांच्या अनुशंसेवर हा मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात अंगराज समरीत, सुरेश बघेल, जया भुरे, प्रभाकर सपाटे, अनिल टेंभरे, रामचंद्र कोहळे, शैलेश गजभिये, महेश डडमल, प्रदिप मासुरकर, अनिल शेंडे, भुमालाताई उईके, सतीश समरीत, नागबोधी गजभिये,विश्वजी पडोळे, सुधीर हेमने, शुभम लांजेवार व इतर उपस्थित होते.
आजच्या या बैठकीत इतर पक्षाच्या अनेक पदाधिकारी सर्वश्री सुरेश पंधरे, झाशिराम मडावी, वसंताजी खरोले, विठ्ठलजी मसराम, पामेश्वर पुरामकर, खेमचंद पुसामे, अंकेश सयाम, वासुदेव कंगाले, केशव भलावी, टेकराम कंगाले, राजकुमार पुराम, चुडीराम वरठे, संतोश पंधरे, तुलशीदास वरकडे, नारायण वरठी, शंकर वरकडे, नामदेव वरकडे, विनायक तुमडाम, भाऊराव सयाम, भिमराव वाढवे, मंगला कळपते, धनिराम टेकाम, जैलाल नामुर्ते, भगवान कळपते, मंसाराम आकरे, चुळामन मडामे, टी.एस.कुंभरे, जी.झेड. सराटे, रोनिल सयाम, गणेश कोराम, काशी कळपते, राजकुमार कळपते, श्रीधन मरसकोल्हे, उरकुडा कुंभरे, निलकंठ पंधरे, शिशुपाल पटले, संतोश वाढवे, संदीप भुरे, बाबु मोतीराम कोकोडे, श्रीधर मरसकोल्हे, डाॅ. सत्यविजय वासुदेव हातझाडे, सौ. ललीता करंजेकर, सौ. मनिशा संदीप मस्के व इतरांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला.