नागपूर मेट्रो महिलांसाठी आरामदायक सुरक्षित वाहतूक प्रणाली
नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यास सभापती श्रीमती शीतल तेली उगले यांनी आज महा मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्टेशन ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन पर्यंत तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प शहराकरिता माईल स्टोन असून नागरिकांनी याचा वापर करावा असे मत श्रीमती. उगले यांनी व्यक्त केले. नागपूर मेट्रोची सेवा नागपूरकरान करिता उपलब्ध असून ग्रीन, सुरक्षित, स्वच्छ, वापरकर्त्यांन करीता उपयुक्त आहे.
महा मेट्रोने विशेषतः महिलांसाठी आरामदायक सुरक्षित वाहतूक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. जगातले कुठलेही मोठे शहर खाजगी चार-चाकी व दु -चाकी वापरतात याने मोठं होत नाही तर तिथले सार्वजनिक वाहतुकीचा वापर किती लोक करतात याने ते शहर मोठं होत असे उदगार त्यानी यावेळी व्यक्त केले. महा मेट्रो रेकॉर्ड वेळेत तयार झाली असून केवळ २७ महिन्यात याचे ट्रायल झाले व त्यानंतर लवकरच नागपूरकरांच्या सेवेमध्ये दाखल झाली. प्रकल्पाला लागणारी ६५% ऊर्जा ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्राप्त होत असून करीत,नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे प्रत्येक स्टेशन येथे पाण्याचा पुनः वापर,पर्यावरण पूरक असल्यामुळे नागपूर मेट्रो खऱ्या अर्थाने ग्रीन मेट्रो आहे.
जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा वापर करून पर्यावरपूरक व स्वच्छ सुरक्षित मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन महानगर आयुक्त यांनी नागपूरकरांना केले. नागपुरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेट्रोचा उपयोग करून वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.