नागपूर : डुंडलोद फोर्ट (राजस्थान) येथे मंगळवारी बिनविरोध झालेल्या भारतीय सायकल पोलो महासंघाच्या निवडणूकीत नागपूर येथील दिनेश सारवे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तर नागपुरचेच गजानन बुरडे यांची सीईओपदी, बी. एस. ठाकरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय मध्यप्रदेश येथील सेवानिवृत्त एअर मार्शल पी. पी. बापट हे अध्यक्षपदी निवडून आलेत.
रघुवेंद्रसिंह डुंडलोद संरक्षक राहणार आहेत. नवीन कार्यकारिणी डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2024 या चार वर्षांसाठी राहणार आहे. कार्यकारिणी अध्यक्ष पी. पी. बापट (मध्यप्रदेश) उपाध्यक्ष- दीपक अहलुवालिया (उत्तराखंड), सुवेंद्र मलिक (पश्चिम बंगाल), बी. एस. ठाकरे (नागपूर), सचिव- दिनेश सारवे (नागपूर), कोषाध्यक्ष- पी. एम. अबोबकर (केरळ), सहसचिव- व्ही. आर. चन्नावार (छत्तीसगड), अरुण पाटील (कर्नाटक), राजेशसिंग इंदोलिया (उत्तरप्रदेश). सदस्य- राजेश कुमार (तमिळनाडू), अहसान अली (जम्मू-काश्मीर), जी. कुमार (पुद्दूचेरी), जी. सी. राव (तेलंगणा), बलविंदर कौर(पंजाब), डी. नागाराजू (आंध‘प्रदेश), आर. के. मोहंती (ओडिशा), सी. के. पांडे (बिहार), बिंदी त्रिवेदी(गुजरात). सीईओ- गजानन बुरडे (नागपूर), संरक्षक- रघुवेंद्रसिंह डुंडलोद(राजस्थान).