नागपूर : सार्वजनिक ग्रंथालय हे ज्ञानदानाचे उत्तम कार्य करीत आहेत.मागील माझ्या सरकारने सार्वजनिक ग्रंथालय कायदा सुधार समिती ची स्थापना करून समितीच्या अहवालानुसार बदल करण्याचे ठरविले होते.परंतू दुर्देवाने सरकार बदलले असले तरी कायद्याच्या धोरणाबाबत आम्ही विधीमंडळात आवाज उठवू असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रंथालय भारती या संस्थेच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
शिष्टमंडळात डॉ सुधीर बोधनकर, डॉ.राजशेखर भालेकर, डॉ.माधव पात्रीकर , रवींद्र गोविंद पांडे, आशुतोष देशपांडे, सुनील वायाळ, डी.बी देशपांडे आणि लक्ष्मण मोरे या प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या समावेश होता.यावेळी ग्रंथालय भारती तर्फे देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देण्यात आले.