- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : शिवजयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन 

छत्रपती शिवाजींच्या राज्य व्यवस्थेबददल मनपा शाळेत शिक्षण : महापौर 

नागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील इमारतीच्या दालनात शनिवारी (१९ फेब्रुवारी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. , अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते, अशोक कुमार शुक्ला, ब्रिजभूषण शुक्ला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. महापौरांनी महापौर कक्षात आणि सत्तापक्ष कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील माल्यार्पण केले.

आपल्या संदेशात महापौरांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचे आदर्श राज्याची संकल्पना त्यांना आईकडून प्राप्त झालेले संस्कार आणि राज्य चालविण्याची नीतिमत्ता, सर्व जाति धर्माचे लोकांना एकत्रित करुन चालण्याची कृतिबददल नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतिहासाव्दारे माहिती दिली जाईल. श्री. तिवारी म्हणाले की माझे सौभाग्य आहे की महापौर म्हणून मला “जाणता राजा” ची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली. 

 छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा होते. आधुनिक विज्ञान शिवरायाच्या राज्य योजनेचा एक भाग होता. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, वृक्ष संवर्धनचा त्यांच्या राज्य योजनेत सहभाग होता. शिवाजी महाराजांनी समाजाच्या खालच्या वर्गांना सोबत घेऊन एक मोठी फौज तयार केली. त्यांनी मूठभर मावळे घेवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापनेसाठी पाऊल उचलले. त्यांचे शासन आदर्श शासन म्हणून ओळखले जाते. महापौर म्हणाले दुर्देवाची गोष्ट आहे की कोणत्याही शाळेत शिवरायांचे शासन व्यवस्थेबददल योग्य शिक्षण दिले जात नाही. मनपा शाळेत याबददल विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करु. बारा वर्षाचे शिवराय कसे संस्कारित झाले हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. जर आईचे संस्कार योग्य रीतीने दिले गेले तर छत्रपती शिवाजी सारखा मुलगा जन्माला येतो, त्यांच्या या विचाराची सध्या देशाला गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *