नागपूर : पालकमंञी नितीन राऊत यांची घोषणा. खासगी कार्यालय या दरम्यान बंद राहतील. शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहील. दारू दुकाने बंद राहतील. माञ आनलाईन दारू मागविता येईल. आमदार निवासात पुन्हा क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येणार.
१० मार्च ला १७०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचर रुग्ण वाढीस लागले असल्याने हा निर्णय घेण्यात आला. विकेंड कर्फ्युला जनतेने गंभीरपणे घेतले नाही. पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आले आहेत, क्वारंटाईन रुग्णांकडून सुद्धा नियमांचे भंग होताना दिसून येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सीमेत लॉकडाऊन. उद्योग सुरू राहतील, खासगी ऑफिसेस बंद असतील. सरकारी कार्यालयात २५ टक्के उपस्थित राहील. मार्च महिना असल्याने काही कार्यालय सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा ( वैद्यकीय सेवा) सुरू राहतील.