नागपूर, ता. २४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २४ मार्च) रोजी १४ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,१०,००० चा दंड वसूल केला. पथकाने के.आर.पांडव कॉलेज, निर्मल नगरी वर रु १०,०००, बिग बाजार एम्प्रेस मालवर रु. १०,००० तसेच आर.डी.डिस्ट्रीब्यूटर्स, टिंबर मार्केट वर रु २५,००० चा दंड केला. विदर्भ शेतकरी भंडार, प्रतापनगर आणि कृष्णा इंफोटेक, सीताबर्डी ला सुध्दा रु १०,००० चा दंड लावण्यात आला. पथकानी ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Related Posts
