अकोला:-भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व,लोकप्रिय केंद्रीय रस्ते,दळणवळण,जहाजबांधणी मंत्री,कार्यकर्त्यांचे आधारवड,न्यायप्रिय,रोखठोक स्वभाचे धनी,कोविड १९ संसर्गजन्य परिस्थितीत गरजवतांना मदतीचा हात देऊन शेकडो लोकांचे प्राण वाचविणारे मा ना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस जिल्हा रुग्णालय व महिला जिल्हा रुग्णालय येथील कोरोना पीडित रुग्णांच्या नातेवाईकांना अन्न दान करून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन हाजी चांदखा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र यांनी केले होते.
उन्हाची तीव्रता पाहता पक्षासाठी जलपात्रे वितरणाचा कार्यक्रम गुड मॉर्निंग ग्रुपचे गजानन गोलाईत यांनी आयोजित केला होता यावेळी १०० जलपात्रांचे वितरण डॉ अशोक ओळंबे मा आ नारायणराव गव्हाणकर यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले.कार्यक्रमाला नगरसेवक हरिषभाई
अलींमचंदानी,आशिष पवित्रकार,गोपी ठाकरे,डॉ संजय धोत्रे,श्रीराम ट्रान्सपोर्ट चे जावेद भाऊ,दीपक मायी, संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदर्भाची कीर्ती पताका दिल्लीत फडकवत ठेवणारे आदरणीय नितीनजी गडकरी म्हणजे कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ! व सामान्य माणसाचे आधारस्तंभच ! वयाच्या १८ व्या वर्षी अभाविप पासून सुरुवात करून २३ व्या वर्षी जनता युवा मोर्चा अध्यक्ष ते भाजपाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष झाले हे त्यांच्या अविरत लोकसेवा व पक्षकार्याचे फलीतच म्हणावे लागेल,आपली दीर्घ दृष्टी, अफाट कार्यक्षमता व भव्य कल्पनाशक्ती, वेगाने राबवीत त्यांनी विकासाचे स्वप्न सत्यात उतरविल्याचे भाजपा नेते तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले यावेळी शेरु अंधारे,सचिन काकड,आशिष शर्मा,संजय लाडविकर,दिनेश श्रीवास,विजय मोटे,आशुतोष काटे,श्रीकांत एखंडे,विजय काकड,जिशान खान,साजिद खान,जमीर खान यांची उपस्थिती होती.