जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट
नागपूर समाचार, १० जुलै : नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज रविभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
श्रीमती विमला आर. यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी
पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नागपूर जिल्ह्यात
सुरू असलेली विकाम कामे व कोविडच्या उपाययोजना
करण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी उमरेडचे आमदार
राजू पारवे उपस्थित होते.