प्रभागासाठी नेहमी तत्पर राहणारे नगरसेवक श्याम कनकम – महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार
चंद्रपूर, ता. ३ : हिंदुस्तान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक 16 येथे नागरी दलित वस्ती निधीअंतर्गत नरसिंग पान सेंटर ते वस्ती नंबर चार पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडले.
शुक्रवार, ता. ३ सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या कार्यक्रमाला झोन क्र. २च्या सभापती खुशबू चौधरी, झोन क्र. १च्या सभापती छबुताई वैरागडे, नगरसेवक प्रदीप किरणे, ज्योती गेडाम, मोहन चौधरी तसेच प्रभागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सदर प्रभागाचे नगरसेवक श्याम कनकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूमिपूजन सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी माननीय महापौर म्हणाल्या, नगरसेवक श्याम कनकम हे प्रभागासाठी नेहमी तत्पर असतात. रस्त्यासाठी ते कायम पाठपुरावा करीत होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कनकम यांनी अशीच सेवा करावी, अशा शुभेच्छा महापौरांनी दिल्या. माननीय महापौर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक श्याम कनकम यांनी आभार मानले.