हिंगणा तहसील कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा
नागपूर समाचार : हिंगणा तालुक्यातील पिपळधरा येथे सिंचन प्रकल्प होणार असून तेथील रहिवाशांसोबत खडकाळ, झुडपी, गावठाण असा भेदभाव न करता जमिनीचे अधिग्रहण व पुनर्वसन नवीन नियमानुसार करा, त्यांना नवीन नियमानुसार चारपट मोबदला, भूखंड व घर बांधून देणे, समृद्धी महामार्गाच्या मुरमा साठी घेतलेल्या शेतीच्या शेतीयोग्य करून द्या, कान्होलीबारा- हिंगणा रस्ता स्थायी स्वरूपात बनवा, कान्होलीनाला तलावाचा गाळ साफ करा, हिंगणा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज हिंगणा पोलीस स्टेशन पासून तालुका कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चासमोर किसान सभेचे जिल्हा सचिव अरुण लाटकर, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे अमोल धुर्वे, अशोक आत्राम, आशा कर्मचारी युनियनचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे व प्रीती मेश्राम यांची भाषणे झाली.
मोर्चा अंती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात कैलास मडावी, विलास अनकर, पंजाबराव उईके, गोपी दास उईके आधी कार्यकर्ते सहभागी झाले होते.