शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी
नागपुर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १२ नोव्हेंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३९ मंगल कार्यालय, २५ मंदीरे, ९ मस्जिद, ६४ शाळा व कॉलेज आणि अन्य ७ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १४४ स्थळांची तपासणी केली.
त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.