सेवा देनारया कर्मचाऱ्यांना निलंबित करणे ही दुर्दैवाची गोष्ट सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष
चंद्रपूर समाचार : चंद्रपूर येथील बस स्टॉप येथे दि 30 ऑक्टोबर 2021 पासून बेमुदत संप सुरू असून आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने एस. टी. कर्मचाऱ्याचा संपाला आज दि १३ नोव्हेंबर २०२१ ला भेट देऊन राज्य शासनात विलीनीकरण मागणीला पाठिंबा दर्शवून समस्या करिता गांभीर्याने प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. आज आम आदमी पार्टी चंद्रपुर ने आपल्या लढ्याला समर्थन असल्याचे पत्र आंदोलकांच्या कृती समितीला देण्यात आले. आम आदमी पार्टी ही सदैव सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असते.
आपल्या योग्य मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आम आदमी पक्षाचा पाठिंबा आपणांस राहणार आहे. असे मत सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले. तसेच या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केल्या जाईल असे मत आंदोलनातील नेत्यांनी व्यक्त केले. हे आंदोलन सर्व संघटना एकजूट होऊन करीत असल्याने राज्य सरकार यात फुट पाडण्याचे प्रयत्न करीत आहे. परंतु राज्य सरकारचे प्रयत्न सफल होणार नाहीत असे मत आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केले.
राज्य परिवहन महामंडळ क्वाईन बाॅक्स, वायफाय सेवा, मोबाईल चार्जर सेवा फक्त ड्रायव्हर सिटच्या मागे लावून महामंडळ तोट्यात असतांना ग्राहकांना सेवा दिल्याचे नाटक करून काय साध्य करू इच्छिते ? असा प्रश्न आम आदमी पक्ष यांनी महामंडळाच्या अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना विचारला आहे.
याप्रसंगी यावेळेला जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे, युवा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, जिल्हा ऑटो रिक्षा अध्यक्ष शंकर भाऊ धुमाले, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, घुग्गुस शहर अध्यक्ष अमीत भाऊ बोरकर, बल्लारपूर शहर कोषाध्यक्ष असिफ भाई, भद्रावती शहर सचिव सुमित हस्तक, बल्लारपूर शहर सचिव ज्योती ताई बाबरे, चंदू माडुरवार, रवींद्र रामटेके, सागर बिऱ्हाडे, अभिषेक सपडी, आशिष पाझारे, उमेश कडू, शमशेर चव्हाण, दिनेश लीपाने, निखिल बारसागडे, तसेच आपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.