भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक
नागपुर समाचार : आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबई येथील बैठकीत उपस्थित राहिले. यावेळी माजी मंत्री मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते मा. देवेंंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. प्रकाशजी, राष्ट्रीय सरचिटणीस श्री. दिलीपजी सौकिया, माजी माजी मंत्री श्री. अनिलजी बोंडे, आमदार आशिषजी शेलार आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील विद्यमान सरकारच्या अनागोंदीचा पाढाच या बैठकीत वाचला. राज्यात भाजप सरकार होते तेव्हा समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, विकास, शेतकरीहित या विषयावर चर्चा होत असत, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गांजा, हर्बल तंबाखू, योजनांना स्थगिती, एसटी कर्मचार्यांच्या समस्या न सोडवता त्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न, शेतकर्यांची वीज कापणे या विषयांचीच चर्चा होत आहे.
Live | Addressing @BJP4Maharashtra State Executive Meeting | #Mumbai
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक | मुंबई https://t.co/iqRju0f5tq— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 16, 2021
राज्याच्या इतिहासातील हे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारच्या कारभारामुळे राज्यात महिला सुरक्षित नाहीत. केंद्र सरकारने ईंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले तरी राज्यातले सरकार मात्र आपले कर कमी करायला तयार नाही.
त्यानंतर माजी मंत्री आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा कडक शब्दांत समाचार घेतला.
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संबोधित करीत आहेत. @Dev_Fadnavis https://t.co/jNXsq7SkSg
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 16, 2021
राज्यामध्ये जनतंत्राचे नाही तर मनतंत्राचे सरकार आहे. स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. एस. टी. कर्मचारी आत्महत्या करत आहेत, ३५०० शेतकर्यांनी व अनेक शोषित महिलांनीही आत्महत्या केल्या, शेतकर्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज या सरकारने घोषित केले, मात्र हे पैसे देताना कंजूसी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने नुकसान झाले तर वर्षभरही या सरकारने शेतकर्यांना मदत केली नाही.
मंत्रालयात न येता विनामुख्यमंत्री चालणारे हे माणुसकी नसलेले सरकार आपल्याला सत्तेवरून दूर करायचे आहे, असा संकल्पही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.