विजाभज आश्रम शाळांना आता हक्काचे संघटन
नागपूर समाचार : नागपूर विभागात विमुक्त जाती व भटक्या जमाती अनुदानित आश्रम शाळांची संख्या 100 च्या घरात असून दोन हजार च्या वर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ. सौ. कल्पना पांडे, डॉ.उल्हास फडके व पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात विजाभज आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना आता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. अनेक दिवसांपासून विजाभज आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न भाजप शिक्षक आघाडी मार्फत सोडविण्यात येत होते, त्यामुळे विजाभज आश्रमशाळा विभाग कार्यकारणी गठित करण्याची मागणी अनेक शिक्षकांकडून होत होती.
डॉ उपेंद्रजी कोठेकर , विदर्भ संघटनमंत्री भाजप यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपच्या विभागीय कार्यालय धंतोली नागपूर येथे विजाभज आश्रम शाळा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. त्याकरिता भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर वरून इच्छुक कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. विभागीय संयोजक पदावर श्री एकनाथ देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून विजाभज आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता हक्काचे, अधिकृत व सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे संघटन मिळाल्यामुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झालेला आहे.
विजाभज आश्रम शाळा या अतिशय दुर्गम व ग्रामीण भागात असून या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आश्रमशाळांमध्ये मुख्यालयी असतात त्यांचे पेन्शन, वरिष्ठ निवड श्रेणी, सुट्ट्या, वेतन, वेतन अनुदान, वैद्यकीय रजा , अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे पुढील काळात आश्रम शाळेतील कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मा.मंत्री विजयजी वडेट्टीवार व मा. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत मा.विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यामूळे संघटनेला मजबूत व बळकट करण्याचे आवाहन आश्रम शाळेतील शिक्षकांना पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांनी केले आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीला डॉ. सौ. कल्पना पांडे, डॉ.उल्हास फडके, अनिल शिवणकर, एकनाथ देशमुख, विनोद राऊत, गंगाधर गौतम, कमलेश पडोळे ,नामदेव माटे, पुरुषोत्तम सेलोटे, सुनील खांडेकर, भैयालाल मस्के, अभय कोडापे, सुखदेव कापगते, चून्नीलाल राऊत ,दिलीप दमाहे, उमेश कुमार बोकडे, उत्तम वाहने, श्यामकुमारी बिसेन, वंदना गौतम, कविता डाहाट, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.